🌟सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे खासदार राहुल गांधी व डॉ.सिध्दार्थ यांची भेट झाली🌟
परभणी - देशाचे काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते ,खासदार राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची काल कडेगाव जि.सांगली येथे भेट झाली असून विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ.पतंगराव कदम यांच्या," लोकतीर्थ" या पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण लोकार्पण सोहळा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कडेगाव जि. सांगली येथे पार पडला.या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजक तथा स्मारक समितीचे स्वागताध्यक्ष भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम यांच्या वतीने करण्यात आले होते.
खासदार राहुल गांधी व डॉ.सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांची भेट झाली तेव्हा राहुल गांधी यांनी डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची आस्थेवाईक विचारपूस केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार,अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मा.खासदार.मुकुल वासनिक ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस नेते मा.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी विविध काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती.या सोहळ्यास परिसरातील लाखोच्या संख्येने महिला- पुरुष युवा वर्गाची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या