🌟शहरासह तालुक्यातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने नोंदवला बंदमध्ये सहभाग : व्यापार पेठेत सर्वत्र जानवला शुकशुकाट🌟
पुर्णा (दि.२२ सप्टेंबर २०२४) :- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटीत मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सातत्याने प्रकृती ढासळत असतांना देखील महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी पुर्णा बंदचे आवाहन केले होते या बंदला शहरासह तालुक्यातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शवत बंदमध्ये सहभाग नोंदवल्याने आज शहरातील व्यापार पेठेत सर्वत्र शुकशुकाट जाणवला सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या पुर्णा बंदला एकंदर आज सर्वत्र उत्स्फूर्त मिळाला.
मराठा समाजाला कायम स्वरुपी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील वर्षापासून प्रखर लढा उभारला असून देखील शासन मराठा समाजाला कायम आरक्षण मिळेल यादृष्टीने तोडगा काढत नसून सातत्याने आश्वासनावर आश्वासन देत आरक्षणाचा विषयावर टोलवाटोलवी करत असल्याने जरांगे पाटील यांनी मागील पाच दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांनी अन्न त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या उपोषणाची तात्काळ घ्यावी या मागणीसाठी आज रविवार २२ सप्टेंबर रोजी पूर्णा बंदची हाक दिली होती त्यानुसार शहर व तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील किराणा दुकान,कापड दुकान,रेडिमेड कापड दुकान,सराफा बाजार,आडत व्यापारपेठ,भाजीपाला/फळांची दुकानांसह संपूर्ण बाजार पेठेतील व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद झाली होती.....
0 टिप्पण्या