🌟यशवंतराव चव्हाण पुर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत चिमुकल्यांचा तान्हा पोळा ऊत्साहात साजरा....!


🌟मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील यशवंतराव चव्हाण पुर्व प्राथमिक इंग्रजी स्कुल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पध्दतीच्या वेभभुषा करुन आणी मातीचे सजवलेले बैल आणून पुजा करत शेतकर्‍यांच्या बैलपोळा सणासाठी रंगत आणली.

               मराठी संस्कृती, शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक होते.यावेळी नंदी बैलांचे पूजन करून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप , नर्सरी , केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत आणि आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते. शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेत शाळेत हजर होते. मराठमोळ्या अंदाजात नृत्य सादर करून सर्वांचे स्वागत केला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वितरण करण्यात आले.या ऊपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धानिष मोहन,निलेश पाटील,मिराज भुरीवाले,वैशाली गावंडे,रोशनी राऊत,निता नरळे,शितल मुळे,खडसे,प्रतिमा शेरेकर,चाॅद गारवे,शितल जमजारे यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या