🌟ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण ०५ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : एकावर गुन्हा दाखल🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील मोरेगाव रस्त्यावर दुधना नदीच्या पुलाखालून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर डिग्रस शिवारात पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून ट्रॉलीसह ट्रॅक्टरची किंमत ०५ लाख तर त्यातील वाळूची किंमत ०५ हजार असा एकूण ०५ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला असून ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू-मोरेगाव रस्त्यावर डिग्रस परिसरात रविवार दि.०८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजता विनापरवाना वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून अवैध वाहतूक करीत असतांना पोलिसांनी ही कारवाई केली. ही वाळू मोरेगाव येथे दुधना नदीच्या पात्रात पुलाखालून उत्खनन करण्यात आली होती. दरम्यान, पोलीस नायक माधव कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये ट्रॅक्टरचा चालक गणेश प्रल्हाद निर्वळ, ट्रॅक्टरचा मालक पाशुखान पठाण (रा. दोघेही डिग्रस वाडी तालुका सेलू) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पुढील तपास करत आहेत.......
0 टिप्पण्या