🌟पुणे येथील वंचित बहुजन आघाडीच्या महत्वपूर्ण बैठकीस परभणी जिल्ह्यातील जवाबदार पदाधिकारी रवाना....!


🌟परभणी (उत्तरचे) जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती व जिल्हा महासचिव शिवाजीराव वाकळे पुणे बैठकीस रवाना🌟 

परभणी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रतील वंचित बहुजन आघाडी चे  जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव व वरिष्ठ पदाधिकारी यांची दिनांक 19 सप्टेंबर 2024 पुणे येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातून नेतृत्व म्हणून परभणी जिल्हाध्यक्ष(उत्तर) मा. तुकारामजी भारती व परभणी जिल्हा महासचिव मा.शिवाजीराव वाकळे यांचा पुणे येथे बैठकीला जाण्यासाठी  परभणी रेल्वे स्थानकात दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय सभासद प्रमोद अशोकराव अंभोरे, पदाधिकारी शेख इसाक सामाजिक कार्यकर्ते रघुवीर सिंग भाई टाक यांच्या वतीने दोघांनाही पुष्पहार घालून सत्कार करून सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या