🌟अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करुन ७२ तासात तक्रारीची पिक विमा कंपनीची अट शिथील करून सरसगट २५ टक्के अग्रीम द्या....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी🌟

परभणी - मागील तीन ते चार दिवसापासून परभणी जिल्हातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्याचा फटका शेतीतील उभ्या पिकांना झालेला आहे. त्यामुळे शेता मध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस व काढणीसाठी आलेल्या मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.


     त्याच बरोबर अतिवृष्टी मुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली व अनेक शेतकऱ्यांचे जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत परंतु महसूल विभागाने अद्यापही अतिवृष्टीत पडलेल्या घरांचे व पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे केलेले नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे.

      जिल्हाभरामध्ये अतिवृष्टी झाल्याने सर्वच नदी नाल्यांना पुर आला आहे. त्यामुळे अनेक गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे. शिवाय इटरनेट सेवा पण बाधीत झाली आहे. अशा परिस्थीती मध्ये नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करणे शेतकऱ्यांसाठी शक्य नाही. करीता ७२ तासाची अट शिथील करुन सरसगट पंचनामा करुन शेतकऱ्याना २५ टक्के अग्रीम देण्यात यावी. तसेच अतिवृष्टीत घराचे, इतर मालमत्तेचे व ज्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली अशा सर्वांचे महसूल विभागामार्फत त्वरीत पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी जीवन डाफकर यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शाखाप्रमुख विष्णू गोल्डे, सुधीर देशमुख, गंगाधर लिजडे, शेषराव लिजडे, संतोष गरुड, मुंजा गरुड, नादान शेख इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या