🌟लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन....!


🌟जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केले संजय राऊतांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन🌟 

परभणी (दि.११ सप्टेंबर २०२४) : लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल जिंतूर येथील सकल ओबीसी समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करीत संताप व्यक्त केला.

             खासदार राऊत यांनी लेखातून स्व. मुंडे यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह विधाने केली. त्या विधानांचा सकल ओबीसी समाजाने जिंतूर तालुका महसूल प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे तीव्र रोष व्यक्त केला. खासदार राऊत यांचे हे लिखाण आक्षेपार्ह आहे. स्व. मुंडे यांच्याबद्दल या पध्दतीने राऊत यांचे आक्षेपार्ह लिखाण हे संतापजनक आहे. यामुळे सकल ओबीसी समाजाच्या भावना कमालीच्या दुखावल्या असून खासदार राऊत यांना शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने तातडीने आवरावे, त्यांच्या नेहमीच्या बेताल विधानांबद्दल कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करतेवेळी सकल ओबीसी समाजाने खासदार राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या