🌟पोलिस यंत्रणा कमालीची सतर्क दि.२१ सप्टेंबर रोजी चारही जिल्ह्यात टाकलेल्या धाडसत्रात १६९ आरोपींवर गुन्हे दाखल🌟
नांदेड :- नांदेड पोलिस परीक्षेचे कर्तव्यदक्ष पोलिस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यापासून नांदेड पोलिस परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्हा/परभणी जिल्हा/हिंगोली जिल्हा/लातूर जिल्हा या चारही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून या चारही जिल्ह्यातील पोलिस दलाला पोलिस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अवैध धंद्यांसह वाढत्या गुन्हेगारीला सक्तीने आळा घालण्याचे आदेश जारी केले त्यांच्या आदेशानुसार या चारही जिल्ह्यात पोलिस दलाने आरंभलेल्या धाडसत्रानंतर अवैध धंदे चालकांसह गुन्हेगारी प्रवृत्तीला अक्षरशः धडकी भरल्याचे निदर्शनास येत असून उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी चारही जिल्ह्यांतील अवैध धंदे चालकांसह गुन्हेगारी प्रवृत्तींना एकप्रकारे दाखवून दिले की कायद्याचे राज्य काय असते.... उपमहानिरीक्षक श्री.उमाप यांच्या निर्देशानुसार नांदेड,परभणी,हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात काल शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी एकाच दिवशी पोलिस दलाने टाकलेल्या धाडसत्रात एकूण १६९ आरोपीं विरोधात गुन्हें करीत ९ लाख ८१ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून या चार जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते.
नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर परिक्षेत्रातील नांदेड, परभणी,हिंगोली,लातूर या चारही जिल्ह्यांतील पोलिस दलाच्या स्वतंत्र बैठका घेऊन जवळपास सर्वच पोलिस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात वाढलेले अवैध व्यवसाय बंद करण्याचे सक्तीचे आदेश दिले होते याकरिता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक कालावधी देखील दिला होता मुदतही देण्यात आली होती नांदेडसह परिक्षेत्रातील परभणी, हिंगोली,लातूर या चारही जिल्ह्यात अवैध धंद्यावर सक्तीच्या कारवाईसाठी संबंधित जिल्ह्यांतील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकांच्या स्थापना देखील करण्यात आल्या नांदेड जिल्ह्यात या पथकाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. त्यामुळे अवैध धंदे चालकासह गुन्हेगारांचाही थरकाप उडाला असून मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या अवैध धंद्यांनाही आळा बसत असल्याचे दिसून येत आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चारही जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी अवैध दारू गाळप आणि विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून दारू व्यवसायाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू गाळप आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध नांदेड परिक्षेत्रात १६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९ लाख ८१ हजार २०५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी १६९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हातभट्टी दारू,दारूचे रसायन,अवैध देशी/विदेशी दारू आदींचा समावेश असून या मोहिमेत पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधिक्षक,सर्व पोलीस उपाधिक्षक,संबंधित पोलिस स्ठाथानकांचे पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक, अंमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.......
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती त्या त्या ठाण्याला द्यावी आणि या मोहिमेस हातभार लावावा असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
0 टिप्पण्या