🌟परभणीत आयोजित जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत पुर्णेतील जवाहरलाल नेहरू इंग्लिश हायस्कूलचा संघ विजयी....!


(विजय संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा🏸)

🌟जवाहरलाल नेहरू इंग्लिश हायस्कूलच्या 14 वर्षातील मुलांच्या गटातील खेळाडूंनी मिळवला दणदणीत विजय🌟 

परभणी : परभणी येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेमध्ये 14 वर्षातील मुलांच्या गटात जवाहरलाल नेहरू इंग्लिश इंग्रजी माध्यम पूर्णाचा संघ विजय झाला.

 विजयी संघाची शालेय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजय संघाचे बॅडमिंटन जिल्हा असोसिएशन परभणी सदस्य गाडेकर सर,  विलास विलास जोशी, कृष्णा शिंदे, विवेक कोंडेकर व क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजय संघास जवाहरलाल नेहरू इंग्रजी माध्यम चे क्रीडा शिक्षक धर्मसिंह बायस यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या