🌟परिसंवादात ग्वाल्हेरचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.अनिलकुमार सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार🌟
परभणी (दि.13 सप्टेंबर 2024) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता रबी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे राहणार असुन मुख्य अतिथी म्हणुन ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे प्रा. डॉ. अनिलकुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक कर्नल सुभाष दैशवाल हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात रबी पिक लागवड, पिकांवरील किडरोग व्यवस्थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे. या परिसंवादास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार आणि परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्हाण यांनी केले आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीद्वारा विकसित रबी पिकांच्या वाणांची विक्रीचा शुभारंभ मंगळवार दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित रबी पीक परीसंवादापासून होणार आहे.
यामध्ये ज्वारीचा परभणी शक्ती (20 क्विंटल), सुपर मोती (24 क्विंटल), परभणी मोती (42 क्विंटल), परभणी ज्योती (8 क्विंटल) विक्रीस उपलब्ध आहे. प्रत्येक वाणाची बॅग 4 किलोची असून प्रति बॅगचा दर 500 रुपये असा आहे. हुरड्याचा परभणी वसंत (4 क्विंटल) हा वाण 1 किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध असून प्रति बॅग 150 रुपये दर आहे. हरभरा वाण बीडीएनजीके 798 (5.50 क्विंटल) , बीडीएनजी 797 (40 क्विंटल), फुले विक्रम (90 क्विंटल) उपलब्ध आहे. दहा किलोची बॅगची पॅकिंग असून बीडीएनजीके 798 या वाणाच्या दर 1000 रुपये तर हरभराच्या इतर वाणाचा दर 900 रुपये प्रति बॅग असा आहे.
जवसाचा एलएसएल 93 (19 क्विंटल) हा वाण उपलब्ध असून 5 किलोची बॅग 650 रुपये आणि 2 किलोची बॅग260 रुपये दरानुसार उपलब्ध आहे. करडईचे पीबीएनएस 154 (15 क्विंटल), पीबीएनएस 184 (5 क्विंटल), पीबीएनएस 12 (30 क्विंटल), पीबीएनएस 86 (30 क्विंटल), पीबीएनएस 40 (10 क्विंटल) उपलब्ध असून 5 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहे. पाच किलोच्या बॅगचा दर 550 रुपये असा आहे. गहू या पिकाचे वाण एनआयएडब्ल्यू 1994 (30 क्विंटल), एनआयएडब्ल्यू 301 (12 क्विंटल), एनआयएडब्ल्यू 1415 (10 क्विंटल) उपलब्ध असून बॅग पॅकिंग 40 किलोची आहे. याचा दर 2000 रुपये प्रति बॅग असा आहे. याप्रमाणे एकूण 394.50 क्विंटल बियाणे रबी हंगामासाठी शेतकर्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे......
0 टिप्पण्या