🌟शेतकर्यांत आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न : कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांचे प्रतिपादन : तीन दिवसीय शिवारफेरीचे उद्घाटन🌟
परभणी :- देशाच्या विकासात शेतीचा प्रमुख वाटा आहे शेती आणि शेतकर्यानां वगळून कोणताच विकास साधता येत नाही शेती पुढे हवामान बदलासारखी मोठी आव्हाने उभे टाकत आहेत ते पेलण्यासाठी शेतीत आवश्यक बदल करावे लागतील शेतीमध्ये ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, यांत्रिकीकरणावर भर देवून आव्हाने पेलण्यासाठी शेतकर्यात क्षमता निर्माण करावी लागेल. शेतकर्यांत आर्थिक सुबकता व स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठे कार्य करत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ.इन्द्र मणि यांनी केले.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवशी शिवार फेरीचे शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी कुलगुरु इंद्र मणि यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते शेतकर्यांसह कृषी शास्त्रज्ञांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. संगिता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक रावसाहेब बागडे, भारत सरकारच्या निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही ही. सदामते, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे (अमरावती) शंकर तोटावर (नागपूर) डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व विद्यापीठाचे संचालक, प्राचार्य आणि विविध विभागाचे प्रमुख यांचे उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे शेतीतील नियोजनात बदल करावे लागतील, नवीन तंत्रज्ञानासह स्वयंचलित शेती करून शेती मधला खर्च कमी करावा लागेल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणार्या वाणाचे संशोधने तसेच त्याचा वापर करण्याची गरजही त्यांनी विशद केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवार फेरीचे आयोजन केले जाते. यामध्ये जवळपास 20 एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे जिवंत पीक प्रात्यक्षिके दाखवण्यात येतात. याशिवाय कृषी विद्यापीठाचे निर्मित शेतीविषयक तंत्रज्ञान तसेच विविध वाणाचे शेतकर्यांना प्रदर्शन आयोजित केले जाते. यातून शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करतात. शिवारफेरीत पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातून शेतकरी सहभागी झाले होते यामुळे विद्यापीठात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.......
0 टिप्पण्या