🌟शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी लागलेला खर्च निघेल यासाठी शासनाने सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा....!


🌟वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांची शासनाकडे मागणी🌟

फुलचंद भगत

वाशिम :- तीन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली आली आहेत. सततच्या पावसामुळे वाढ खुंटली आहे. पिकांना पाहिजे तसे वातावरण न मिळाल्याने व अपेक्षित वाढ न झाल्याने हितभर कपाशीच्या पिकाला फुलपाती लागलेली दिसत आहे, तर सोयाबीन पिकांचा फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला शेंगा नसल्याने शेतकरीवर्ग पूर्णतः हताश झाला असून, संकटात सापडला आहे.

               महागाईचे बी बियाणे उधारी, उसनवारी, कर्ज करून शेतकरी विकत आणतो, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत वेगवेगळ्या वन्यप्राण्यांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करतो मात्र या स्मानी संकटांनी शेतकऱ्यांवर घाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच जातो. एवढा मोठा खर्च उत्पन्नात घट आहेच. त्यामुळे सततच्या पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली आली असून, पिके पिवळी पडून सडली आहेत. कपाशी,सोयाबीन, तूर ही हंगामातील प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.सिंचनाची फारशी सुविधा नसल्याने काही शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेऊ शकतात, मात्र उर्वरीत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही. विविध संकटांचा सामना करुनही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चार ते पाच हजार रुपये एवढा भाव मिळत असल्याने लागलेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. नंतर सोयाबीन पिकावर पिवळा मोझेंक व अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. एवढे असतानाही तीन हजार पाचशे ते बेचाळीसशे पर्यंत एवढा सोयाबीनला भाव होता, मात्र एवढ्यात सोयाबीनचा भाव चार हजार पाचशे ते पाच हजार पर्यंत पोहचला आहे. शेतकऱ्यांना शेतीमशागतीपासुन सोयाबीन घरी येईपर्यंत जेवढा खर्च लागला तेवढी रक्कम आलेल्या उत्पादनाची मिळत नसल्याने शेतकरी वर्ग घाट्यात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून, शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे त्यांना सोयाबीन निघल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी लागलेला खर्च निघेल यासाठी शासनाने सोयाबीनला  सहा हजार रुपये प्रति  क्विंटल खरेदी करावी अशी शेतकर्‍यांमधुन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या