🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीन वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार🌟


✍️ मोहन चौकेकर

💫 आमचा महाराष्ट्र आमचे मतदान या टॅग लाईन खाली तारखांची घोषणा न करता महाराष्ट्रात निवडणूक होणार असल्याची निवडणूक आयोगाने केली घोषणा केली  घोषणा ; निवडणूक काळात एटीएम व्हॅनिला निर्बंध ; तक्रारीसाठी  सुविधा पोर्टल ॲप

💫 महाराष्ट्रात ९ कोटी ५९ लाख मतदार, त्यात ४ कोटी ५९ लाख पुरुष तर ४ कोटी ६४ लाख महिला मतदार. वृद्ध मतदारांना घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देणार, नवमतदारांची संख्या १९ लाख ४८ हजार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती.

💫 आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या, दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात  निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केलीय. ((मुंबईतील पत्रकार परिषदेत)) राजीव कुमार यांची माहिती.

💫 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीन वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती.

💫 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडलं याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार. नावाची घोषणा करण्यापूर्वी तीन दिवस आधी माहिती देणं बंधनकारक. राजीव कुमार यांची माहिती.

💫 मविआची सावध भूमिका, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना, विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश.

💫 विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोट बांधणार, मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा, प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न

💫 महाराष्ट्र बिहार नाही, त्यामुळे निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. 

💫 ओबीसी हा भाजपचा डीएनए, ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं वक्तव्य

💫 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल, गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल...केंद्रीय निवडणूक आयोगचं कडक धोरण.

💫 निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्युचं प्रकरण चर्चेत, इंजेक्शन दिल्यामुळं अटॅक आल्याचा अनेकांना संशय, संजय शिरसाटांचं वक्तव्य...पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार, केदार दिघेंचं प्रत्युत्तर.

💫 'लाडकी बहीण'साठी खर्च केल्यावर  पगारालाही पैसे उरणार नाहीत अशी राज ठाकरेंची टीका, शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता असाही केला सवाल.

💫 सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी, रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुकसोहळा.

💫 संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंग राजपूत, राजू शिंदे आणि दिशेन परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता, सूत्रांनी दिली  माहिती..

💫 जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबत

💫 अमृता फडणवीसांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे  कौतुक, उद्धव ठाकरे-शरद पवारांवर केली जोरदार टीका

✍️ मोहन  चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या