🌟परळी शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना नगर परिषदकडून मदत कार्य सुरु....!


🌟पालकमंत्री धनंजय मुंडेंनी पुरग्रस्त भागाची केली पाहणी : पूरग्रस्तांना निवारा,जेवणाची नगर परिषदकडून व्यवस्था🌟


 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्राला पूर येवून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे तारांबळ उडाली. ही माहिती कळताच मंगळवारी पहाटे परळीच्या उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर व नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तातडीने पोहोचले व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली .तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने मदत कार्य केले आहे. शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना नगर परिषदकडून मदत कार्य सुरु केले आहे. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पुरग्रस्त भागाची केली पाहणी केली. पूरग्रस्तांना निवारा, जेवणाची नगर परिषदकडून व्यवस्था करण्यात आली. 

               आंबेवेस भागातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.  हे पाणी  शहरातील, मिलिंद नगर, बरकत नगर, इंदिरानगर, भिमानगर , कृष्णा नगर, गोपाल टॉकीज रोड,आंबेवेस , रहेमत नगर ,गंगासागर नगर , कुरेशी नगर,भुई गल्ली, सिद्धार्थ नगर, सर्वे नंबर 75 मधील  घरात आज मंगळवारीपहाटे पाच वाजता  पाणी शिरलेआहे.जवळपास 1000 कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले . व  अनेकांच्या घरात चीखल झाला आहे. पहाटे साडेपाच वाजता परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिका मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे , अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता  विभागाचे शंकर साळवे, सुनील आदोडे यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच मदत कार्य सुरु केले आहे.नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यात साचलेला कचरा काढण्यासाठी जेसीबीच्या दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. आहे.सकाळी  अकरा पर्यंत प्रशासनातील अधिकारी थांबून नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या व  नगरपालिकेने 3  ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली आहे. मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीच्या पात्रात पूर आल्याने 1000 कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने भेट देऊन या भागातील नागरिकांना 3 ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले तसेच या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी 16  पथक नेमण्यात आले. या पथकात तलाठी नगरपालिका कर्मचारी असतील अशी माहिती परळी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली .

* पूरग्रस्तांना नगर परिषद प्रशासनाकडून तात्पुरत्या निवासाची व जेवणाची व्यवस्था :-                                                   

परळी शहरातील काही भागात मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीच्या पात्रात पूर आल्याने 1000 कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने भेट देऊन मदत कार्य सुरु केले आहे. पुरग्रस्ता कुटुंबाची शहरातील शाही फंक्शन हॉल, मिलिया हायस्कूल, मिलिंद नगर येथील बौद्ध समाज मंदिर या 3 ठिकाणीं तात्पुरत्या स्वरूपाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांची तहसील कार्यालय मार्फत धन्य वाटप व नगरपरिषद कार्यालयामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. 

* कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन केली  पाहणी :-

    परळी शहरात मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या पुर परिस्थितीचा फटका अनेक भागातील नागरिकांना बसला आहे. पूरग्रस्त भागाची कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व भागाची पाहणी करून प्रशासनास सूचना दिल्या यावेळी नगर परिषद व तहसील प्रशासनाचे अधिकारी उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या