🌟अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली🌟
फुलचंद भगत
वाशिम:-अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,शाखा मंगरूळपीरच्या जवानांची साहसी कामगीरी शहरात असलेल्या तलावातुन मनोरुग्णाचा कुंजलेला मृतदेह बाहेर काढला.
मंगरूळपीर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात मध्यभागी असलेल्या तलावात एका ईसमाचा मृतदेह तरंगत असताना दिसून येत असल्याची माहीती आज सकाळी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे,गोपाल गीरे,शुभम भोपळे,शिवा अडात,लखन खोड़े,दत्ता मानेकर,पंकज जटाळे,प्रदीप बुधे,संतोष मांडवगळडे,यांना आज घटनास्थळी पाठवीले आणी तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता आज 23 सप्टेंबर रोजी सकाळी अथक प्रयत्नांनंतर तलावातील मृतदेह बाहेर काढून पोलीसांच्या ताब्यात दीला.मृतक हे पवन माणिक रावपलाई अं.वय (27) वर्ष रा.ता.मंगलधाम मंगरुळपीर जि.वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले.यावेळी मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे पो.नि.सुधाकर आडे,पिएसआय ज्ञानेश्वर धावडे,पो.काॅ. संजय घाटोळे,पो.काॅ. अणिल दहातोंडे,पोकाॅ. आशिष रघुवंशी,पो.काॅ. अमोल वारकड,पो.काॅ.बबन अंभोरे,आणी नातेवाईक हजर होते. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.....
0 टिप्पण्या