🌟असे पोलीस निरीक्षक,नानलपेठ पोलिस ठाणे परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟
परभणी (दि.30 सप्टेंबर 2024) : परभणी शहरातून साई नगर येथील मुलगी मैत्रीणीच्या वाढदिवसाला जाते म्हणून निघून गेली असून, तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलीसांचा शोध सुरु आहे. तरी खालील वर्णनाची मुलगी कुणाला आढळुन आल्यास त्यांनी पोलीस निरिक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
साई नगर कॉर्नर परभणी येथील ऋतीक सुभाषराव कुरील यांच्या तक्रारीवरुन चुलत बहिण स्वाती किशोर कुरील वय 22 वर्ष ही दि. 24 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता चुलत भाऊ आदित्य हा तीला परत आनण्यासाठी गेला असता शास्त्री नगर येथील ब्युटी पार्लर मालकीन हीची मुलगी हीने ती दुपारी 2.35 वाजता माझ्याकडून पाचशे रुपये घेऊन मैत्रीणीचा वाढदिवसा करीता मला जाणे असल्याचे सांगून निघून गेली आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मि.क्र.32/2024 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्णन रंग गोरा, चेहरा उभंग,केस काळे, इनवटीवर तीळ, उंची 5 फुट 4 इंच, बांधा मजबुत, अंगात टॉप गुलाबी रंगाचा व ब्लु जीन्स पॅन्ट, पायामध्ये काळ्या रंगाचा शुज, हिंदी भाषा अवगत आहे. या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाची मुलगी आढळुन आल्यास त्यांनी तपासीक पोलीस निरीक्षक श्री. कामठेवाड (मो. 9552536918) यांच्याशी संपर्क साधावा असे पोलीस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.......
0 टिप्पण्या