🌟पुर्णा पंचायत समिती समोर दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन दिवसांचे आमरण उपोषण सुटले.....!


🌟प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य🌟


पुर्णा :- दिव्यांगाच्या हक्काचा पाच टक्के निधी वाटप, दिव्यांग निराधार परीतक्त्या व विधवा भगिनींसाठी घरकुलामध्ये प्राधान्य मिळावे, ग्रामपंचायतचा 5% दिव्यांग निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी तसेच दस्तापुर येथील एमआरजीएस व घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पासून पूर्णा पंचायत समिती कार्यालय समोर प्रहार जनशक्ती त्याच्या वतीने पदाधिकारी व दिव्यांग व निराधार बंधू-भगिनींचे आमरण उपोषण पंचायत समिती पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, पवन जोगदंड, सिद्धेश्वर आगलावे, सर्कल प्रमुख विठ्ठल जोगदंड, बाबाराव देशमाने, रामभाऊ गाडेकर, प्रकाश शिनगारे, उत्तम सोळके यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. 

उपोषणाच्या आज तिसऱ्या दिवशी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती पूर्णा चे गटविकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या त सर्व मागण्या मागण्या केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर संबंधित आमरण उपोषण सोडण्यात आले उपोषण सोडण्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपोषणकर्त्यांसह उपोषण सोडण्यासाठी आलेले अधिकारीही पावसात चिंब भिजले उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणावर दिव्यांग, विधवा व परीतक्त्या भगिनी, निराधार उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला होता.

पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड व पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास घोबडे यांच्या हाताने शीतपेय घेऊन उपोषणाची सोडण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, विष्णू बोखारे, बळीराम गुंडाळे, गोविंद सातपुते, संभाजी खंदारे, तुकाराम पारवे, खोबराबाई राजभोज, विजय मालाबाई झिंजाडे, अनुसयाबाई म्हस्के, विठ्ठल जोगदंड, चंपत कदम, शिवाजी शेरकर, गणपतराव मोरे, गणेशराव जोगदंड इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या