🌟मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मेळाव्याचे आयोजन......!


 🌟सदर मेळाव्यास पात्र उमेदवारांनी हजेरी नोंदवून संधीचा लाभ घेण्याचे - प्राचार्य विकास आडे

परभणी (दि.26 सप्टेंबर 2024) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुख्यमंत्री युवा मेळाव्याचे आयोजन दि. 30  सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. याअंतर्गत 12 उत्तीर्ण, पदविका/डिप्लोमा, पदवीधारक उमेदवारांना या योजनेत सहा महिन्याकरीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येत असून त्यांना 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार, पदविका/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना 8 हजार आणि पदवीधारक उत्तीर्ण उमेदवारांना 10 हजार प्रति महा मानधन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त आस्थापनांनी (शासकीय/अशासकीय) या मेळाव्यास उपस्थित नोंदवावी तसेच सदर मेळाव्यास पात्र उमेदवारांनी हजेरी नोंदवून संधीचा लाभ घेण्याचे आव्हान औद्यिगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या