🌟शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार....!


🌟गोदाकाठच्या बाधित क्षेत्राची केली पाहणी करतांना आ.राजेश विटेकर यांनी शेतकऱ्यांना दिले आश्वासन 🌟

परभणी/सोनपेठ (दि.११ सप्टेंबर २०२४) : राज्यासह परभणी जिल्ह्यात सर्वत्र मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून यातून तो बाहेर पडुन पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी आपण सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांनी केले.

            आमदार विटेकर यांनी १० सप्टेंबर रोजी सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या लोहिग्राम, लासिना, उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी या गावांना भेटी देऊन बाधित शेतकर्‍यांशी संवाद साधला. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवड्यापासून दररोजच कुठल्या ना कुठल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकत असताना या नैसर्गिक संकटाची दाहकता किती भयान आहे हे दिसत आहे. आजही सर्वत्र शेतामध्ये पाणीच पाणी दिसत आहे. अशा वेळी शासनस्तरावरून सर्वोतोपरी मदत कशी देता येईल ? यासाठी सातत्याने प्रशासनाला सूचना देत आहे, असे नमूद करीत शेतकर्‍यांना सरसगट मदत मिळेपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहणार आहोत, असे आ. विटेकरांनी शेतकर्‍यांशी बांधावर संवाद साधताना म्हटले.

           यावेळी आमदार  विटेकर यांच्यासह सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दशरथ पाटील सुर्यवंशी, माजी सभापती रंगनाथ रोडे, श्रीराम भंडारे, श्रीकांत मोरे, उत्तम जाधव, शेतकरी संघटनेचे माधवराव जाधव, अजित देशमुख, गिरीश हालगे, सुर्यकांत कदम, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थिती होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या