(प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड ऊस तोड कामगारापासून शेतीत सुरवात राज्यस्तरीय पुरस्कारा पर्यंत थक्क करणारा प्रवास : पुरस्कार स्वीकारताना आवरगंड कुटुंबं व उपस्थित मान्यवर)
🌟मुंबई येथील सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम वरळी येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान🌟
पुर्णा (दि.30 सप्टेंबर 2024) :- अन्नदाता शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्यांच्या सुख दुःखात कर्तव्य पारायनता म्हणून आम्ही सर्व राज्यशासन कटीबंध आहोत.राज्यातील शेतकऱ्यांच्या योगदानामुळे राष्ट्रीय स्तरावरील 'उत्कृष्ट महाराष्ट्र कृषिराज्य' पुरस्कार मिळाला आहे. म्हणून बळीराजा सुखी तर जग सुखी असे प्रतिपादन राज्यपाळ सी.पी.राधाकृष्णण यांनी केले आहे.पुर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमधील माखणी या छोट्याशा गावातील प्रगतशील शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना राज्यस्तरीय कृषि पुरस्काराने मुंबई येथे राज्यपाल व इतर मान्यवरांच्या हस्ते काल रविवार दि.29 सप्टेंबर 2024 रोजी सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम वरळी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास राज्यपाल सी पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे,दादाजी भुसे, कृषि सचिव जयश्री भोज, कृषि आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या सहा मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागमार्फत शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या 2020, 21,22 यां तीन वर्षातील 448 शेतकरी बांधवाना राज्य स्तरीय कृषि पुरस्कारने वरळी, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. त्यात पूर्णा तालुक्यातील जनार्धन बालासाहेब आवरगंड यांची निवड झाली. त्यांना वसंतराव नाईक मराठावडा कृषि विद्यापीठ परभणी येथील विविध पुरस्कार प्राप्त झाली आहेत. ऊस तोड कामगार म्हणून काम करणाऱ्या कष्टाळू प्रामाणिक शेतकऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड होणे आनंदाची बाब आहे.परीसरात कृषि दूत म्हणून काम पाहत शेतमालावर प्रक्रिया उद्योग म्हणून लाकडी तेलघाणा,वनस्पती पासून सुंगधी उटणे, झाडपाला पासून औषध निर्मिती, आंबा लोणचे, जात्यवरील विविध दाळी, यासह सर्व पापड, कुरुड्या, वाळाकाच्या ऊसऱ्या बांयोगास स्लरी पासून गांडूळखत खतनिर्मिती , भरडधान्य आदी विविध ओंकार गृह उद्योगाच्या माध्यमातून चालवतात. पत्नी मीरा आवरगंड, वडील बालासाहेब,आई, मुलगा ओंकार, मुलगी शिवानी, गावातील ओंकार माहीला बचत गट यांच्या सहकाऱ्यातून सर्व काम केले जातात.
आपल्या जिल्ह्यातील जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना सहकार्य करणाऱ्यात दैनिक सकाळचे गणेश पांडे गिरीधर पांडे यांचे मार्गदर्शन ,कैलासवासी गंगाधर दादा पवार कुलगुरू डॉ इंद्रमणी,परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे जिल्हा विकास प्रकल्प अधिकारी रस्मी खाँडेकर,उप कार्यकारी अधिकारी ओमप्रकाद यादव,पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी,जिल्हा उप पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर,उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी दीपक सामाले, डॉ प्रशांत भोसले, डॉ अमित तुपे, डॉ गजानन गडदे, सुरेश काळे,स्वाती घोडके,जी. डब्ल्यू रणेर,भाजीपाला उत्पादक ग्रुपचे प्रगतिशील शेतकरी पंडितराव थोरात, रामेश्वर साबळे, प्रकाश हरकळ,विद्याधर संगई आदीने सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या