दैनिक जागरण वृत्तपत्रात आरोपींच्या सिखलकर जातीचा जाणीवपूर्वक उल्लेख.....!


🌟नांदेड येथील सिकलीकर समुदायाकडून 'दै.जागरणचा' निषेध करीत संपादकावर कारवाई करण्याची मागणी🌟 


नांदेड :- मध्य प्रदेशातील दैनिक जागरण या आघाडीच्या वृत्तपत्रात दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी 'मध्य प्रदेश के सिखलीगर गिरोह के दो बदमाश दबोचे' पुलीस की मठभेडमे दोनो गोली लगणे सें घायल आभुषण बरामद एक बदमाशपर २५ हजार रुपये का ईनाम या बॅनरखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते वास्तविक पाहता गुन्हे करण हा एकमेव धर्म असलेल्या गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारचा धर्म किंवा जात नसते परंतु त्या गुन्हेगारांचा उल्लेख करतांना जाणीवपूर्वक त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्याची विकृती प्रसिध्दी माध्यमांत निर्माण होत असल्याने त्या जाती किंवा धर्मातील लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असून याचा गंभीर दुष्परिणाम त्या जाती/धर्मातील लोकांना भोगावा लागत असल्याने या वृत्तपत्रा विरोधात नांदेड येथील सिख सिकलीकर समाजात तिव्र असंतोष निर्माण झाला असून भाई मनीसिंघजी सिख सिखलीकर वेल्फेअर सोसायटी महाराष्ट्र नांदेडचे मुख्य प्रवर्तक भाई बलजीतसिंघ भगवानसिंघ बावरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन दैनिक जागरणचे मुख्यसंपादक यांनी आरोपींच्या सिकलीकर जातीचा जाणीवपूर्वक उल्लेख करुन संपूर्ण सिकलीकर समाजाची बदनामी करीत त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने दैनिक जागरणचे मुख्यसंपादक यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


भाई मनीसिंघजी सिख सिखलीकर वेल्फेअर सोसायटी महाराष्ट्रच्या वतीने पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या तक्रारीवरून तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश राज्यात कार्यरत आघाडीचे दैनिक जागरण या वृत्तपत्राने आमच्या सिख धर्मातील एक अल्पसंख्याक समाज (पोटजात) असलेल्या सिकलीकर समाजाचा अवमान केला असून त्यामुळे आमच्या समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्या आहेत यामुळे आमच्या समाजात खुप आक्रोश निर्माण झाला आहे.

तरी मे.जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दैनिक जागरण / मथुरा उत्तरप्रदेशचे मुख्य संपादक यांच्यावर धार्मीक भावना दुखवल्याबाबतचा गुन्हा दाखल करावा असे देखील नमूद केले असून यावर नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे संपूर्ण सिख सिखलीकर समाजाचे लक्ष लागले आहे दरम्यान भाई मनी सिंघजी सिख सिकलीकर वेलफेअर सोसायटी (महाराष्ट्र) च्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सिकलीकर समाजातील बलजीतसिंघ बावरी,अजितसिंघ जुन्नी,आझादसिंघ बावरी,तारासिंघ टाक,ज्योतसिंघ दुधनी,जसमिंदरसिंघ बावरी,जितुसिंघ टाक वसरणी,शेरसिंघ जुन्नी,पापासिंघ जुन्नी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या