🌟अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन कडून महात्मा फुले नगरात वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण....!


🌟अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व राज्य पदाधिकारी अशोक एंगडे यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग सादर केले 🌟

पुर्णा :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पूर्णा व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पूर्णा या संघटनांकडून महात्मा फुले नगर येथे वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. 


सध्या शहरात विविध ठिकाणी अंधश्रद्धेच्या घटना ऐकायला आणि बघायला भेटत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघटनांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व राज्य पदाधिकारी अशोक एंगडे यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग सादर करून त्यामागील कार्यकारण भाव सांगितला व कशा प्रकारे भोंदू बाबा लोकांची लूट करतात याची लोकांना जाणीव करून दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व विशेष परिश्रम घेणाऱ्यांमध्ये डी वाय एफ आय शहर सचिव सुबोध खंदारे, अंनिसचे तालुका प्रधान सचिव व डी वाय एफ आय चे तालुकाध्यक्ष जय एंगडे, डी वाय एफ आय जिल्हा कमिटी सदस्य सचिन नरनवरे, डी वाय एफ आय तालुका उपाध्यक्ष राज जोंधळे, तालुका सहसचिव निरंजन खंदारे, शहर उपाध्यक्ष वैभव जाधव, शहर कोषाध्यक्ष रत्नदीप काळे, मनोज इंगळे, आदी कार्यकर्ते होते. याशिवाय स्थानिक नागरिकांमध्ये शेख अल्लाबक्ष, बाळू हातागळे, विजय लोखंडे व बरेच तरुण, महिला आणि बालके होती. कार्यक्रमाची सुरुवात व शेवटी चळवळीतील क्रांतिकारी गीतांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी वाय एफ आय चे जिल्हा सचिव तथा अंनिस चे जिल्हा युवा कार्यवाह नसीर शेख यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या