🌟शेतकरी बांधवांनों सावधान : शेतीच्या पिक विम्या संदर्भात आलेल्या कॉल वरुन होऊ शकते फसवणूक...!


🌟पिक विमा संदर्भात आलेल्या कॉल करणाऱ्यांना आपला ओटीपी सांगू नका🌟

🌟नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन🌟 

महाराष्ट्र राज्यात सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (ओटीपी) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल आणि जर तुम्ही सांगितलेल्या लिंक वर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बैंक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते म्हणुन सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधवांनी खालील सुचनांचे पालन करावे असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री अबिनाश कुमार यांनी केले आहे.

* अनोळखी मोबाईल क्रमांकावरून शेती विमा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कॉल आला त्यावर विश्वास ठेवु नये व आपली माहीती सांगु नका.

* शेती विमा संदर्भात तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी पाठवल्यास ते शेअर करू नका.

* शेतकरी बांधवानो या फसवणुकीबद्दल सावध व्हा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासुन तुम्ही वाचाल.

* अशाप्रकारे आपल्या मोबाईल मधील ॲक्सेसची अनावश्यक परवाणगी मागणारे ॲप किंवा त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

तुमच्या सोबत अशा प्रकारची फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधा.

सायबर शाखा टोल फ्रि नंबर 1930, असुन, राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळ (http://cybercrime.gov.in/). सायबर पोलीस स्टेशन, नांदेड फोन क्रमांक 02462-24027, असा आहे.

* ईमेल-(cybercell.nanded@mahapolice.gov.in) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनहितार्थ : जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड़

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या