🌟महाराष्ट्र सरकारने केली ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा....!


🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील ब्राह्मण समाजाने सरकारने केलेल्या घोषणेचे स्वागत करीत केला जल्लोष साजरा 🌟 

पुर्णा :- महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला स्थापना व मंजुरी दिल्यामुळे पूर्णा येथील सकल ब्राह्मण समाजाकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.


 गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजाकडून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती यासाठी  आंदोलने व पाठपुरावाही करण्यात आला होता जालना येथे दीपक रणनवरे व सर्व  ब्राह्मण समाज बांधवांनी  यासाठी उपोषणही करून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेतले होते शासनाने आज सोमवारी दिनांक २३ सप्टेंबर रोजी  आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या  ब्राह्मण समाजाकडून आनंद व स्वागत करण्यात आले शहरातील दत्त मंदिर परिसरात फटाके फटाके फोडून  जल्लोष करण्यात आला यावेळी  आयोजित कार्यक्रमात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भगवानराव पाटील, भास्करराव भाले, सतीश टाकळकर यांनी  विचार व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण वांगे यांनी केले या याप्रसंगी प्रा. चंद्रकांत बुरटे ,अरविंदगुरु जोशी , भगवानराव पाटील, भास्करराव भाले, डॉ. दीपक जोशी, सुरेंद्र चिटणीस, विजय कनकदंडे ,रवींद्र चिटणीस, गोविंद चौधरी, मधुकर जोशी, मकरंद कुलकर्णी, सतीश टाकळकर, सुनील देशमुख ,सुभाषचंद्र ओझा, रवी पांडे, तुषार पाटील, गिरीश जोशी, यांच्यासह ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या