🌟परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथुर यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे केली मागणी🌟
परभणी - पूर्णा पंचायत समिती लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधीत बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या खात्यात पेन्शन निधी वळता करून सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांचा घोटाळा संबंधित स्थानिक निधी लेखा ऑडिट तपासणीत निदर्शनास आला आहे.
पूर्णा पंचायत समिती लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नियोजबध्द पद्धतीने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पेन्शन व भविष्य निर्वाह निधी यात बोगस लाभार्थी दाखविले गेले. त्यांच्याशी अर्थपूर्ण संगनमत करून त्यांच्या खात्यात पेन्शन निधी वळता केला गेल्याचा प्रकार ऑडिटनंतर उघडकीस आला हा १ कोटी ५३ लाख रुपयांचा केवळ अपहार नसून तो शासकीय तिजोरीवर घातलेला दरोडा आहे. शासकीय तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या पंचायत समिती पूर्णाच्या तत्कालीन लेखा विभागातील अधिकारी, कर्मचारी व गटविकास अधिकारी त्याच बरोबर या प्रकरणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर शासकीय रक्कमेचा अपहार करून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथुर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या चौकशी करण्यात आल्या परंतु या सर्व चौकश्या आजपर्यंत दाबून टाकण्यात आल्या व दोषी लोकांना पाठीशी घालण्याचे काम नेहमीच जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना प्रशासनाकडून कसूर झाल्यास अथवा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास प्रकरण दडपणाचा प्रयत्न होत आहे. करीता या प्रकरणामध्ये दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशार आहे या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, पूर्णा तालुका प्रमुख शिवहर सोनटक्के, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, विष्णू बोकारे, श्रीहरी इंगोले, बळीराम गुंडाळे, विठ्ठल जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या