🌟चार पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का ? एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे🌟
🌟 एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही दफन होणार...अक्षयच्या वकिलांची माहिती..पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय.
🌟 चार पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का ? एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे...पिस्तुल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का, कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती.
🌟 मनोज जरांगे यांचं उपोषण नवव्या दिवशी स्थगित...संध्याकाळी सोडणार उपोषण...ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करण्याचा दिला इशारा
🌟 ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असे शरद पवार,उद्धव ठाकरे कडुन लिहून घ्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान, सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर शरद पवारांची सही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फडणवीसांचा गौप्यस्फोट
🌟 भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्य़ा भूखंडावरून वाद...अजित पवार आणि राधाकृष्ण विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा...ट्रस्ट मंदिराचं, खासगी नाही.चंद्रशेखर.. बावनकुळेचे स्पष्टीकरण.
🌟 मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, विजय वडेट्टीवारांची टीका, तर सब भूमी देवाभाऊ की, संजय राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका
🌟 मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
🌟 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पुणे दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य, आजही मुसळधार पावसाचा इशारा
🌟 मधुकर पिचड, वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता, शरद पवारांची पुन्हा घेतली भेट, तर रासप नेते रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ देखील हाती तुतारी घेणार
🌟 कंत्राटी शिक्षक भरतीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक... २२ शिक्षक संघटनाचं आज सामूहिक रजा आंदोलन.
🌟 सोन्याच्या दरात मोठी उसळी, जळगावात सोन्याचा दर ७७ हजारांवर, अमेरिकी फेडच्या व्याजदर कपातीचा परिणाम
🌟 मनोज जरांगेनी नवव्या दिवशी उपोषण थांबवले', मनोज जरांगेंचा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय ; विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही,मनोज जरांगेचा सरकारला इशारा ; 'आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेणार' मनोज जरांगेंचा आरक्षणासाठी तगादा सुरुच,आचारसंहितेपर्यंत सरकारला दिली मुदत
🌟 पिस्तुल हिसकावल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती ; अक्षय शिंदेच्या मृतदेहाला अग्नी देणार नाही, पुरावे नष्ट होऊ होऊ नये म्हणून शव पुरण्याचा निर्णय
🌟 उद्धव ठाकरे- शरद पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा; अमित शाहांच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना ; बाजारबुणगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवारसाहेबांना खतम करा; हिंमत असेल तर येऊन तर बघा, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार
🌟 अजितदादा पवार महायुतीतून बाहेर पडतील अन् ते आमच्या महाशक्तीत येतील; आमदार बच्चू कडूंचा दावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का? अजित पवारांचा संदर्भ देत अरविंद केजरीवालांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना पाठवलं पत्र
🌟 शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; परळीतील राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी दिला गर्भीत इशाारा ; कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून आमदार रत्नाकर गुट्टेंच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
🌟 पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा ; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी ; कोराडी येथील संस्थेला पाच हेक्टरच्या भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती; देवाच्या देवास्थानात तरी राजकारण करू नका
🌟 संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट, कुठे रेड कुठे ऑरेंज; IMD ने सांगितला संपूर्ण हवामान अंदाज ; पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीचे साम्राज्य
🌟 अकोल्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांचा अर्ज; आधार कार्ड निलंबनाची कारवाई, मागवला खुलासा ; इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट
🌟 लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
🌟 कसोटी क्रमवारीतही ऋषभ पंतचा डंका! सहाव्या क्रमांकावर घेतली झेप; विराट कोहली टॉप-10 बाहेर
🌟 70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर 76 हजारांवर
🌟 मुहूर्त ठरला! मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो एप्रिल 2025 पर्यंत धावणार, तिकीट किमान 10 रुपये ते 50 रुपये असण्याची शक्यता
🌟 अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून हायकोर्टाकडून सरकारची कानउघडणी
🌟 मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ; मुंबईत जोरदार पाऊस, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या