🌟पुर्णा तालुक्यातल्या माखणीत महालक्ष्मी पुढे सुंदर देखावे साकारणारे मीरा जनार्धन आवरगंड यांच्या कुटुंबाचे सर्वस्तरातून कौतुक....!


🌟आपण जो व्यवसाय करतो त्याची कधीच लाज बाळगू नये  देखाव्यातून दिला महिला शेतकऱ्यांना मोलाचा संदेश🌟

(महालक्ष्मी पुढे सुंदर देखावे ग्रामीण भागात साकारणारे माखणी येथील मीरा जनार्धन आवरगंड यांचे कुटुंब)

      " कष्टाची बरी भाजी भाकरी 

      तूप साखरेची चोरी नको "

या संताच्या अभंगानुसार आपल्या घरची महालक्ष्मी तांत्रिक पद्धतीने न उभारता ग्रामीण भागातील संस्कृती जोपासत आपल्या मालकाला शेतीचे  विविध प्रगतसील पुरस्कार मिळालेले  प्रथम दर्शनी लावून देखावा तयार केलेला पाहण्यासाठी गावातील नागरीकानी गर्दी केली होती.

पुर्णा तालुक्यातील माखणी मीराताई जनार्धन आवरगंड महिला शेतकरी यांनी अतिशय सुंदर असा महालक्ष्मी चा देखावा केला आहे आपण जे काम करतो ते कामाची लाज न बाळगता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असा हा देखावा मीराताईंनी केला आहे त्या एक आदर्श प्रगतशील  शेतकरी आहेत त्यासोबतच गृह उद्योग करतात महिला गट चालवतात महिलांना रोजगार उपलब्ध करून देतात त्यांचा जो काही मानसन्मान वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे त्यांनी अगदी अभिमानाने या देखाव्यातून तो दाखवला आहे आपण जो व्यवसाय करतो त्याची कधीच लाज बाळगू नये असे या देखाव्यातून त्यांनी सर्व शेतकरी महिलांना आवाहन केलं आहे.

        विविध प्रकारचे लोणचे पापड्या, कुरडया, खारवड्या, उसऱ्या, लाकडी  घाण्याचं तेल, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तयार करून विक्री करतात इतर शेतकरी महिलांना प्रोत्साहन म्हणून हा देखावा त्यांनी साकारला आहे अतिशय सुंदर देखावा पंचक्रोशीतील  नागरीक यांनी गर्दी केली होती.परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील माखणी या गावच्या मिराबाई जनार्धन आवरगंड यांनी महालक्ष्मीच्या पुढे  मांडून आपण जे कार्य करतो यांचे बॅनर व आपल्याला जे काही सन्मानचिन्हे मिळाले आहेत.त्यांचे देखावे केले होते. त्यांची मुलगी शिवानी आवरगंड यांनी  बैलाचे  छायाचित्र काढून इतर महिलांना खचून न जाता व कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता आपण कार्य केले पाहिजे यातून त्यांनी संदेश महिला भगिनींना दिलेला आहे. शेतकरी जगला तरच सर्व जग सुखाने समाधानाने राहील म्हणून जगाचा पोशिंदा जिवंत राहील असा संदेश लिहुन जानीव जागृती महालक्ष्मी सणा चे औचित्य साधले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या