🌟शुक्रवार दि.१३ सप्टेंबर रोजी जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन🌟
परभणी (दि.११ सप्टेंबर २०२४) : महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांना म्हणजे जिल्हाधिकार्यांना एक लेखी परिपत्रक बजावून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजित केलेल्या बैठकीस पूर्व तयारीनिशी उपस्थित रहावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण आठ जिल्ह्यातील निवडणूक अधिकार्यांची सकाळी १०.४५ ते ११.२५ पर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीतून प्रामुख्याने मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती, कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा, मतदान केंद्रांची तपासणी, मतमोजणी केंद्राचा प्रस्ताव, मतदान साहित्याचा आढावा, मतदार याद्यांच्या निरंतर अद्यावतीकरणाचा आढावा, एनजीआरएस, स्लिप विषयक आढावा, कन्ट्रोल रुम, मिडीया रुम, नोडल ऑफिसर, नियुक्ती संदर्भात आढावा तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात सर्व निवडणूक अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्यांना बजावले आहेत.....
0 टिप्पण्या