🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली मागणी🌟
परभणी (दि.२९ सप्टेंबर २०२४) :- दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने उद्या दि.30 सप्टेंबर रोजी खासदारांची विभागीय रेल्वे परिषद होणार आहे या बैठकीत मराठवाङयातील प्रलंबित विविध रेल्वे प्रश्नी खासदारांनी आक्रमक होऊन समस्या मार्गी लावाव्यात अशी विनंती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने विभागातील सर्व खासदारांना केले आहे.
या बाबत माहिती अशी की तब्बल तीन वर्षानंतर दमरेच्या नांदेड विभागाने नांदेड परिमंडळातील सर्व खासदारांची बैठक 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे.या बैठकीत खासदारांनी पुढील विषयी मुद्दे बैठकीत मांडावेत अशी अपेक्षा महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे त्यात नांदेड- पुणे करिता दिवसा चालणारी नवीन गाडी सुरू करणे, नांदेड- वास्को (गोवा) नवीन गाडी सुरू करणे, कोविड पूर्व नांदेड- औरंगाबाद इंटरसिटी गाडी पुन्हा सुरू करणे, पुणे तसेच पनवेल गाड्यांना कायमस्वरूपी तीन कोचेस जोडणे, तपोवन आणि नंदीग्राम गाड्यांना एलएछबी रॅक ने चालवणे,औरंगाबाद-अकोला तसेच पंढरपूर - शेगाव नवीन गाडी सुरू करणे, रायचूर- परभणी तसेच पटना- पूर्णा रेल्वेचा विस्तार जालना पर्यंत करणे तसेच परभणीच्या दोन्ही खासदारांनी परभणी स्टेशनचे अमृत भारत अनवये काम सुरू करणे, परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 निर्मिती करणे,परभणी स्थानकावर सर्व प्लॅटफॉर्म वर शोचालय, पिण्याचे पाणी, डिस्प्ले बोर्ड बसवणे, नवीन पादचारी पुलास भिंत पाडून बाहेर जाण्यास रस्ता सुरू करणे आदी बाबत बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेग्जराज,प्रा.सुरेश नाईकवाडे,राजेंद्र मुंढे,बाळासाहेब देशमुख,कदिर लाला हाश्मी, माणिक शिंदे बलसेकर,रुस्तुम कदम, डॉ.राजगोपाल कलानी,दयानंद दीक्षित,विठ्ठल काळे आदीनी केली आहे......
0 टिप्पण्या