🌟पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्तें करण्यात आले तिरंगा ध्वजारोहण🌟
पुर्णा (दि.१७ सप्टेंबर २०२४) - पुर्णा शहरातील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पुरणाच्यावतीने 77 वा मराठवाडा मुक्ती दिन संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी पुर्णा चे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे याच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण वाचनालयाच्या इमारतीवर करण्यात आले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नामदेव राजभोज पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष यादव भवरे उपस्थित होते भदंत उपयुक्त महाथेरो यांच्या उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात शाळा व महाविद्यालय यांच्या शिस्तीप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला शहरातील उपासक उपासिका यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये रिपाई नेते प्रकाश कांबळे न प चे माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे, हर्षवर्धन गायकवाड ,श्रीकांत हिवाळे ,शाहीर विजय सातोरे, विजय बगाटे, साहेबराव सोनवणे, शामराव जोगदंड, कैलास बलखंडे ,पीजी रणवीर ,अनिल अहिरे ,राम भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विहारातील भंते पहिल्या वंश यांच्या मार्गदर्शनात यांच्या संयोजनात संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला उपस्थित सर्व उपासक उपासिका तसेच विद्यार्थी वर्ग यांना खिचडी व मिठाईचे वाटप करण्यात आले......
0 टिप्पण्या