🌟सोशल एज्युकेशन मुव्हमेंटच्यावतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भगत बोलत होते🌟
हिंगोली :- "मोडेन पण वाकणार नाही, अन्यायपुढे आणि असत्यापुढे झुकणार नाही ," हे ब्रीद आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे आपल्याला प्राप्त झालेला मानवजन्म हा अत्यंत अनमोल आहे.किड्या मुंग्यासारखे जगण्यासाठी आणि मरण्यासाठी नाही तर स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि जनहिताची कामे करत मरण्यासाठी हा अनमोल मानवी जन्म लाभलेला आहे," असे विचार सेवानिवृत्त मुख्याध्यापक डि.जे.भगत यांनी व्यक्त केले ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा ६१ वा वाढदिवस होता त्यानिमित्त टी.एम.पोघे यांच्या गीतांजली पार्क हिंगोली येथील निवासस्थानी सोशल एज्युकेशन मुव्हमेंटच्यावतीने त्यांचा हृद्य सत्कार करून अभिष्टचिंतन केले. सत्काराला उत्तर देताना भगत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की "माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले, अनेक ठिकाणी माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला; परंतु मी कुठल्याही अन्यायापुढे आणि असत्यापुढे झुकलो नाही, डगमगलो नाही ,घाबरलो नाही. कायदेशीर वाटा चोखाळल्या पण त्याचबरोबर स्वतः मजबूत राहिलो. म्हणून सर्वांनी अगोदर कायद्याची पुस्तके, संविधान वाचायला पाहिजे त्याचा अभ्यास करायला असे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक चढ-उतार ,चांगल्या वाईट घटना अनुभव कथन केले पुढे भगत साहेब म्हणाले की सोशल एज्युकेशन मुव्हमेंटच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी खूप जवळून निरीक्षण करतो. त्यांचा प्रामाणिकपणा, निरपेक्षता, निस्वार्थ मने आणि महापुरुषाप्रती कृतीशील निष्ठा आणि समाज व चळवळीविषयी कृतिशील तळमळ , आस्था, धडपड हे मी पाहिले,अनुभवले आणि म्हणून मलाही SEM आवडते आणि इथून पुढेही मला जसे जमेल तसे या चळवळीला आणि या महाप्रकल्पाला योगदान देणार आहे , असल्याचे सांगितले.
वाढदिवसानिमित्त प्रथम त्यांनी सोशल एज्युकेशन मुव्हमेंट संचालित राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली कृत अशोका पार्क जवळा पळशी रोड हिंगोली येथे महाराष्ट्रव्यापी सर्वधर्मीय , महाउदेशीय आणि बहुउद्देशीय सेवाभावी महाप्रकल्पाच्या बांधकाम परिसरात बोधीवृक्षारोपण केले त्यानंतर टी.एम. पोघे यांच्या निवासस्थानी त्यांच्या अभिष्टचिंतनाचा छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला प्रथम उपस्थितांनी विश्वदीपांना पुष्पाभिवादन केले. सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहणानंतर आदरणीय डी.जे. भगत साहेब यांना पुष्पमालांकित करून, स्नेहप्रतीकाचा बुके देऊन व आयुष्याचा गोडवा म्हणून मिठाई भरवून त्याचा हृद्य सत्कार केला.
याप्रसंगी SEM चे अग्रणी व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यउपाध्यक्ष रमेश इंगोले सरांनी* *मनोगत व्यक्त केले. दोघांनी एका केंद्रात काम केले असल्यामुळे त्यांच्या अनेक चांगल्या आठवणींना,चढउतारांना व कार्याला उजाळा दिला व त्यांना भावी सुखी, आनंदी, निरोगी ,आयुष्यासाठी मंगल कामना केल्या. याप्रसंगी SEM अग्रणी कार्यकर्ते डॉ. युवराज भुक्तार साहेब यांनी बोलताना सांगितले, की डी.जे.भगत यांच्या धाडसाविषयी, संघर्षाविषयी आणि बाबासाहेब आंबेडकराप्रती निष्ठा, प्रामाणिकपणाविषयी अनेकांच्या तोंडून ऐकले. काही दिवसापासून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद होत आहे आणि त्याच्यातून मला त्यांचे व्यक्तिमत्व कळत आहे . असे स्वाभिमानी निडर व्यक्तिमत्व समाजात फार कमी आहेत असे मत नोंदवून त्यांनी भगत साहेबांना पुढील सुखी निरोगी आनंदी उदंड आयुष्याच्या मंगल कामना केल्या.
याप्रसंगी टी.एम.पोघे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की १९९२ पासून भगत साहेब आणि आमची घनिष्ठता आहे.शिक्षक पतपेढीच्या निवडणूका असल्या तरी त्यांनी S.C.साठी एक राखीव आणि एक सर्वसामान्य प्रवर्गातून जागा देण्याची रेटून मागणी केली त्यांच्या आयुष्यात ते मोठमोठ्या शक्तींना कधीच घाबरले नाहीत,अन्याय सहन केला नाही, अन्यायाने झालेल्या बदल्या त्यांनी सहन केल्या नाहीत. ते लढाऊ व्यक्तिमत्व आहे. कोणाचा केवढाही " आवाज " असला तरी डी.जे भगत साहेबांच्या " DJ च्या दणदणाटा " समोर सर्व आवाज फीके पडले या " DJ चा दणदणाट " अजूनही कायम आहे मानवाधिकार आयोगापर्यंत त्यांनी दाद मागितलेली आहे. ते एक अभ्यासू आणि चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. सर्वच महापुरुषांच्या चरित्राचा ते अभ्यास करतात आणि ते सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासत आहेत समाजकार्याविषयी त्यांना फार आस्था, तळमळ आहे. SEM च्या पुढाकाराने हाती घेतलेले कार्य हे मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, हे ज्यांना कळले त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपरातून धम्मदान पाठवून दिले आहे आणि त्यांनी त्यांचा आर्थिक योगदानाचा योगदान वाटा उचलला आहे.
सेम ही एकानुवर्ती संघटना नाही , एक नेता नाही , समूह नेतृत्वावर ही चळवळ चालते. प्रत्येकाचा सन्मान राखला जातो या चळवळीत कोणीही मानसन्मानाचा सत्काराचा,हार - तूऱ्याचा ,खुर्चीचा , पदाचा भुकेला नाही. हे या चळवळीचे वैशिष्ट्य आहे. बीज जसं जमिनीत घेत आणि स्वतःचं अस्तित्व संपवतं आणि त्याला पुढे अनेक मधूर फळे लागतात.त्याच पद्धतीने महापुरुषांच्या आदर्श विचारावर चालणारी ही लोकहितकारी चळवळ आहे. अशा चळवळीकडून भगत साहेबांना भावी सदानंदी, सदाविजयी, निरोगी उदंडआयुष्यासाठी अभिष्टचिंतन व मंगल कामना केल्या.
यावेळी पि.यू .बनसोडे सर बोलताना म्हणाले की, भगत साहेबांनी बहुजनांच्या चळवळी, संघटना, फोडण्याचे पाप कधीही केले नाही.उलट चळवळी फोडणाऱ्या विघटनवादी लोकांना त्यांनी ओळखले आणि चळवळीत कोणी दुही माजवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ते धावून आले आणि ती चळवळ, संस्था संघटना टिकवण्यासाठी, एकजीव राहण्यासाठी त्यांनी मनोमन प्रयत्न केले.
*चळवळीला त्यांनी भरभरून आर्थिक योगदान दिलेले आहे.*
या मंगल प्रसंगाचे वैचारिक भाषेत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिरीष वाघमारे सरांनी केले या वाढदिवसाचे औचित्य साधून भगत साहेबांनी महाराष्ट्रव्यापी, सर्वधर्मीय बहुउद्देशीय आणि महाउद्देशीय सेवाभावी महाप्रकल्पाच्या बांधकामास ५०००/- रु. धम्मदान दिले. यापूर्वी त्यांनी पाया सुरू झाला तेव्हाच २५ सिमेंट बॅग्ज (मूल्य १०, ०००रु.)+ ५००+५०००+५०००)= एकूण २०,५००/- रु. सत्पात्री सद्धम्मदान दिले आहे.
या छोटेखानी पण वैचारिक वाढदिवसाला प्रा.डॉ.कृष्णा इंगळे, डॉ.शिरीष वाढवे, डॉ.युवराज भुक्तार, शामराव नरवाडे, पी यु बनसोडे, शिरिष वाघमारे, टी. एम. पोघे उपस्थित होते......
__________________________________
0 टिप्पण्या