🌟सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलनाचा दिला इशारा🌟
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंढरपूर , लातूर , नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आरक्षणाच्या हक्कासाठी धनगर जमातीच्या वतीने परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. सरकारचा जाहीर निषेध नोंदवत घोषणा दिल्या. परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर आंदोलकांनी बीड -परभणी-नांदेड महामार्ग रोखून धरला. या रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे काही काळ वाहतुक खोळंबली होती. धनगर आरक्षण प्रश्नी सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजचे युवा नेते शिवदास बिडगर व आदोलकांनी दिला आहे.
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर जमातीला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर धनगर समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्या आव्हानाला पाठिबा देत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी अंदोलकांनी जोर धरला. समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाची अंमलबजावणी करून त्यांना आरक्षण देण्याची मागणी करत रस्त्यावर बसून आंदोलन केले . “आम्ही राज्य सरकारकडे नवीन काहीही मागत नाही. आम्हाला फक्त आमचा हक्क हवा आहे जो भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो म्हणजे एसटी प्रवर्गातून आरक्षण,”आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. उशीर झाल्यास आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल आणि परिणामास सरकार जबाबदार असेल.” वर्दळीच्या रस्त्यावर सुमारे एक तास हे आंदोलन चालल्याने परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली होती. तहसीलदार यांना समाज बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी धनगर समाजाचे युवा नेते शिवदास बिडगर, विकास बिडगर, दिलीप बिडगर, माऊली गडदे, भिवा बिडगर, विश्वनाथ देवकते, चंद्रकांत देवकते, भिमराव सातपुते, कमलाकर बिडगर, माऊली धायगुडे, मुंजा फुके, प्रविण बिडगर, लक्ष्मण कावळे, कपिल गाडेकर, नवनाथ दाणे, दादाराव गडदे, महादेव हाके, शाम सरवदे, गणेश देवकते, गोविंद यमगर, अंगद देवकते, रामभाऊ कोपणर, महादेव गडदे, चंद्रकत बिडगर, गोपाळ बिडगर, शिवाजी कुकर, सुग्रीव बिडगर, शाम सरवदे, परमेश्वर वैद्य, श्रीहरी कामाळे, हनुमंत कामाळे, व्यंकटेश हरणावळ व सकल धनगर समाज परळी-वैद्यनाथ जिल्हा बीड यांनी केले आहे. तसेच बंजारा समाजाचे युवा नेते बाळासाहेब (पपू ) चव्हाण व माळी समाजाचे नेते विलास आढाव यांनी आरक्षनास पाठींबा दिला......
0 टिप्पण्या