🌟अनुभूती अर्बन मल्टीपल निधी लि.चा द्वितीय वर्धापन दिन तथा भव्य मोफत आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहत संपन्न.....!


🌟शिबिर यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले🌟

   

✍️ मोहन चौकेकर                       

चिखली :- अनुभूती अर्बन मल्टीपल निधी लि.चिखली अंतर्गत येणाऱ्या शाखा अमडापूर चा द्वितीय वर्धापन दिन व मोफत आरोग्य तपासणी शिबीर प.पु.शालिकराम जी चवरे गुरुजी संत निरंकारी मंडळ जिल्हा संयोजक तथा ज्ञान प्रचारक यांच्या मार्गदर्शन खाली डॉ. प्रवीण लक्ष्मण राजपूत स्त्रीरोग तज्ञ,डॉ. प्रसाद गजानन निकम नेत्ररोग तज्ञ व शल्यचिकित्स्यक,डॉ प्रशांत अशोकराव चिंचोले हृदयरोग तज्ञ डॉ अजय चवरे एम. एस. व शल्यचिकिस्त्यक व डॉ भूषण इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहत व आनंदात भव्य दिव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर अमडापूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह येथे दिनांक 22/09/2024 वार रविवार ला सकाळी 9.00 ते 1.00 वाजेपर्यंत पार पडले. यावेळी अमडापूर व आजूबाजूच्या परिसरातील हजारो  गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात तज्ञ डॉक्टर मंडळी कडून नेत्र तपासणी हृदयासंबधी तपासणी, स्त्रियांच्या संबंधित आजारांची तपासणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अनुभूती अर्बन मल्टीपल निधी लि. चे  अजय चवरे उपाध्यक्ष,गोपाल चौधरी सचिव,अँड सौ. रुपाली चौधरी संचालिका ,जीवनकुमार जाधव संचालक,रामेश्वर चौधरी संचालक, नितीन सवडतकर संचालक, संदीप चवरे संचालक मालतीताई चवरे, गजानन सवडतकर,रवी सवडतकर, अमडापूर शाखेचे व्यवस्थापक दिपक देशमाने , पत्रकार विनोद चव्हाण, राजेश बिडवे,  संतोष सावंत,दिपक इंगळे, दत्तात्रय हिरगुडे, गजानन इंगळे, डॉ. प्रवीण वतारी, गणेश भिवटे व  बँकेचे संपूर्ण कर्मचारी वर्ग व परिसरातील अनेक मान्यवर व प्रतिष्टीत मंडळी यांची उपस्थिती होती . यावेळी आलेल्या सर्व मंडळी करिता बँकेच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले......                                      

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या