🌟उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा व आमरण उपोषण....!


🌟या आमरण उपोषणामध्ये उमेद-महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी🌟

फुलचंद भगत

वाशिम :  उमेद अभियानाला ग्रामविकास व पंचायत विभागाचा एक स्वतंत्र्य विभाग म्हणून दर्जा द्यावा व यामधील जे कर्मचारी व अधिकारी आहेत यांना कायम करण्यात यावे तसेच यामधील कम्युनिटी केडर यांना अंगणवाडी सेविकेप्रमाणे दर्जा देवून त्यांना 10 हजार रुपये मानधन करावे या प्रमुख मागण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने आज दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यायावर भव्य मोर्चा काढून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.


                मागील अनेक दिवसापासून शासन दरबारी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका मांडत असून जुलै महिन्यात आझाद मैदान येथे लाखोंच्या संख्येने तीन ते चार दिवस आंदोलन केले होते. त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तब्बल अडीच महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुढील आंदोलनाच्या दृष्टीने संघटनेच्या वतीने गाव स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलने, प्रभात फेरी काढून, जनजागृती मेळावे, उमेद मागणी जागर, दिंडी व महा अधिवेशन भरविण्यात येणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले. या आमरण उपोषणामध्ये उमेद - महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या