🌟श्री गुरुद्वारा भजनगढ़ साहिब ते श्री गुरुद्वारा बंदाघाट साहिब गोदावरी नदीकाठ परिसराच्या स्वच्छतेसह पथदिव्यांची व्यवस्था करावी..!


🌟 नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाची महानगर पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

नांदेड (दि.२६ सप्टेंबर २०२४):- नांदेड येथील श्री गुरुद्वारा भजनगढ़ साहिब ते श्री गुरुद्वारा बंदाघाट साहिब (श्री गुरुद्वारा लंगर साहिब) गोदावरी नदीकाठ परिसरासह या परिसरातील सार्वजनिक रस्ताच्या साफ-सफाईसह या परिसरात पथदिवे लाईट,फोकस आदी रोशनाईची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी तख्त सचखंड श्री अबचलनगर साहीब गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने आज गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी एका लेखी निवेदनाद्वारे नांदेड महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.


तख्त सचखंड श्री अबचलनगर साहीब गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने नांदेड महानगर पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की आगामी दशहरा महोत्सव-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक ०५ आक्टोंबर २०२४ पासुन गुरुद्वारा तख्त सचखंड श्री अबचलनगर साहिब नांदेड येथे दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक व गुरु महाराजाचे दलपंथ दाखल होत आहेत या निमित्ताने सदर परिसरात सतत निरंतर दसरा महोत्सव पुर्णतः साजरा होईपर्यंत लंगर प्रसादाचे आयोजन व दलपंथ सोबत हत्ती,घोडे,आदी वास्तव्यास असतात यामुळे भाविकांची रेलचेल वाढते. यास्तव सदर परिसर व रस्त्यांची नियमित पणे साफ-सफाई एवंम भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता सदर परिसरातील पथदिवे रस्त्याचे लाईट फोकस लावुन संपूर्ण परिसरात रोशनाई करावी असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर महानगर पालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून या निवेदनावर गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या