🌟न्यायालयाने सुनावली १५ दिवसांच्या कैदेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अर्जदार मेधा किरीट सोमय्यांनी जिंकला दावा🌟
मुंबई : राज्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना यांना न्यायालयाने एका अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवून १५ दिवसांच्या कैदेसह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी अब्रुनुकसानीचच्या खटल्याचा निकाल देताना खा.राऊत यांना १५ दिवसांची कैद व २५ हजार रुपयांचा देखील ठोठावला आहे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती २०२२ मध्ये शौचालय घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता संजय राऊत कोर्टात हजर होणार असून १५ दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत...
0 टिप्पण्या