🌟विजेची चोरी करणाऱ्या १० ते १५ ग्राहकांना रंगेहाथ पकडून ठोठावला ०६ लाख रुपयांचा दंड🌟
पुर्णा (दि.३० सप्टेंबर २०२४) :- पुर्णा शहरासह तालुक्यात विज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे विजेची गळती रोखण्यासाठी महावितरण कंपनीने भरारी पथकांमार्फत कारवाईला सुरुवात केली असून आज सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी पूर्णा शहरातील अलंकार नगर,अमृत नगर,इकबाल नगर,मस्तानपुरा,फुलेनगर, आंबेडकरनगर,विजयनगर आदीं भागात या पथकाने अचानक धाडी टाकत विद्युत मिटर मध्ये चालाखी करत वीज चोरी करणारे,वीज मिटर मध्ये छेडछाड,आकडा टाकून वीज चोरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवत वीजेची चोरी करणाऱ्या १० ते १५ ग्राहकांना रंगेहाथ पकडून त्यांना सर्वांना सुमारे ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती महावितरण सुत्रांनी दिली आहे.
महावितरण कंपनीकडून त्यांच्यावर वीज चोरी कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. वरील प्रकारा बाबत येथिल महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगेश खरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, हा आमच्या कार्यवाहीचा भाग आहे. पूर्णा शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज गळती होत आहे. त्यामुळे भरारी पथकांसह स्थानिक महावितरण कडूनही वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. कोणीही वीज मध्ये कोणतीही छेडछाड न करु नये, वीजेचीरी न करता महावितरण कडून रितसर नोंदणी करून कनेक्शन घ्यावे. वेळत वीज बीले भरून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी खरगे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या