🌟यानिमित्त श्वानदंश झाल्यावर नेमके काय उपचार करायचे याबद्दल उपस्थित रुग्णांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले🌟
वाशिम :- जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधून काल शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्त श्वानदंश झाल्यावर नेमके काय उपचार करायचे याबद्दल उपस्थित रुग्णांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
कुत्रा चावल्या नंतर आवश्यक असलेले सर्व उपचार ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत. रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीज होऊ नये म्हणून आवश्यक ते उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी लागणारे इंजेकशन जसे कि अँटी रेबीज व्यक्सीन आणि अत्यंत महाग असणारे अँटी रेबीज सिरम हे दोन्ही इंजेकशन आपल्या रुग्णालयात उपलब्ध आहेत.रेबीज हा आजार मुख्यता वन्य प्राणी कुत्रा मांजर आदी प्राण्यांनी चावा घेतल्यास होऊ शकतो आणि जर चावा घेतल्या नंतर सर्व इंजेकशन घेतले तर हा आजार पूर्णतः बरा होतो तसेच उपचार न घेतल्यास हाच आजार जीवघेणा ठरु शकतो कारण हा आजार झाल्यास यावर आजपण पूर्ण उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे मंगरूळपीर परिसरातील सर्व नागरिकांनी श्वानदंश किंवा इतर वन्य प्रान्याने चावा घेतल्यास घाबरून न जाता ग्रामीण रुग्णालयात यावे आणि त्यावर योग्य तो उपचार करून घ्यावा असे ग्रामीण रुग्नालय मंगरुळपीर यांचेकडुन आवाहन करण्यात आले आहे.....
फुलचंद भगत
0 टिप्पण्या