🌟पुर्णा तालुक्यातील कमलापूर मिरखेल येथील निराधार ताईच्या कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंची भेट....!


🌟एचएआरसी संस्थेचा उपक्रम ; निराधार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली🌟 

 पुर्णा (दि.२९ सप्टेंबर २०२४) :• पुर्णा तालुक्यातील कमलापूर व मिरखेल  येथे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ( एचएआरसी ) संस्थेच्यावतीने टीम २ निराधार विधवा ताईच्या कुटुंबास  महिनाभर पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्याची किट देत त्यांच्या अनाथ लेकरांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. 

  परभणी जिल्ह्यातील एचएआरसी संस्था ही गरजु विद्यार्थी,अपंग ,विधवा आदी घटकांसाठी विविध पद्धतीने काम करते.यावेळी संस्थेने पूर्णा तालुक्यातील मौजे कमलापूर व मिरखेल येथिल दोन निराधार कुटुंबाची निवड करत संस्थेचे अध्यक्ष  डॉ पवन चांडक,मुख्याध्यापक संतोष रापतवार, सुनील सूर्यवंशी दत्ता आबुज,रवी जाधव,संतोष रत्नपारखे,सचिन राठोड,अर्जुन चव्हाण व हरिभाऊ देशमुख या सदस्यांनी त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना मदत देऊ केली.यावेळी देण्यात आलेल्या किट मध्ये महिनाभर पुरेल इतके  साहित्य गहू,तांदूळ,तुरडाळ,चना डाळ,मसूर डाळ,मूग डाळ,साखर,सोयाबीन तेल, चटपट मसाला,विक्रम चहा,रवा,मैदा, पोहा,मुरमुरा,मीठ,शेंगदाणे,शाबुधाना, हळद,मिरची,मोहरी,जीरा,व्हील साबण,काडी पुडा,लाईफबॉय साबण,  इत्यादी साहित्याचा समावेश आहे. त्यासोबतच या कुटुंबातील मुलांच्या  शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे.याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक म्हणाले की, भविष्यात  उदरनिर्वाहासाठी साधन देऊन निराधार ताईला स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करण्याचा मानस आहे.लोकसहभागातून असाच उपक्रम एचएआरसी संस्था पुढेही राबवणार आहे.ज्यांना मदत देण्याची इच्छा असेल अश्या दात्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या