🌟पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांची सेलू येथे बदली.....!


🌟सेलू न.पा.चे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर युवराज पौळ यांची नियुक्ती🌟 

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापने संदर्भात आज सोमवार दि.०९ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने शासन आदेश क्रमांक: एमसीओ-२०२४/प्र.क्र.२७४/नवि-१४ अंतर्गत आदेश जारी करुन परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या बदलीचे आदेश जारी करीत त्यांची सेलू नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केलेल्या आदेशात असं नमूद केलं आहे की महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार, खाली नमूद केलेल्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्यात येत आहे पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी श्री.पौळ यांना दि.०९ सप्टेंबर २०२४ (म.नं.) पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी पदस्थापना दिलेल्या पदावर उद्या मंगळवार दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी रुजू होवून, तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असेही आदेशात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या