🌟या स्पर्धेसाठी चिखली तालुक्यातील बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : चिखली शहरातील स्थानिक अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल येथे कर्मयोगी ऋषीतुल्य तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी चिखली तालुक्यातील बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या प्रसंगी सर्व मान्यवर , स्कूल कमिटीच्या अध्यक्षा ॲडवोकेट वृषालीताई बोंद्रे, स्कूलच्या सल्लागार मार्गदर्शिका सुजाता कुल्ली मॅडम, मुख्याध्यापक बालैय्या गंगाराबोयना सर, अनुराधा प्री प्राइमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम तसेच परीक्षक म्हणून यु. यु. खरात सर आणि अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जोशी मॅडम यांची उपस्थिती लाभली होती.
या स्पर्धेत चिखली तालुक्यातील एकोणावीस शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी मार्गदर्शन करताना अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा वृषाताई बोंद्रे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा , त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या स्पर्धेत छत्रपती संभाजी विद्यालय केळवद येथील कु. मयुरी संजय भोजने हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 3000/- , सन्मान चिन्ह, व प्रमाणपत्र पटकावले. तर
श्री. शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मेरा बुद्रुक येथील कु. भक्ती गजानन मापारी हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000/- , सन्मान चिन्ह, व प्रमाणपत्र मिळविले. तर आदर्श विद्यालय चिखलीची कु.अनुष्का अमोल फितवे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 1000/- , सन्मान चिन्ह व प्रमाणपत्राची मानकरी ठरली. तर उत्तेजनार्थ बक्षीस शहाजीराजे विद्यालय उदयनगर येथील कु.श्रेया गणेश चोपडे आणि अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली येथील कु. लायबा खान यांनी रोख रक्कम रुपये प्रत्येकी 500/- , सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मिळविले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून माननीय वृषाली ताईंनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक करून त्यांना मार्गदर्शन पर भाषणातून पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. बालैया गंगाराबोयना सर यांनी ही विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता स्कूल मधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या