पुर्णा : पुर्णा तालुक्यात दि.३१ ऑगस्ट ते दि.०४ सप्टेंबर २०२४ असा जवळपास चार ते पाच दिवस मुसळधार अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह फळ/भाजीपाला बागायती पिकांसह पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे तहसिलदार व महसूल प्रशासनाने अतिवृष्टी भागांची पाहणी करुन अतिवृष्टी बाधित पिकांचे व पशुधन नुकसानिचे तात्काळ पंचनामे करीत शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयें देण्यात यावे या करीता आज गुरुवार दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व घनदाट मामा मित्र मंडळाच्या वतीने तहसिल माधवराव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांनी निवेदन स्विकारले यावेळी शहाजीराव देसाई,रितेश काळे,पारवे,गंगाधर बुचाले,दयानंद कदम,अन्वर पठाण,परशुराम उर्फ बाऴु जोगदंड,शेख अंजिम,साहेबराव लोखंडे,गजानन भाकरे,चंद्रकांत कुऱ्हे,राज नारायनकर, अमोल पळसकर ,रफिक खुरेशी,आदींची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या