🌟राज्यातील सोनार समाजाचा राज्य सरकारला खडा सवाल ? २९ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विधानसभे परिणाम🌟
नाशिक (प्रतिनिधी) - मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस चा नामविस्तार सोहळा तसेच श्री संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळ दिनांक २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मंजूर न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना सोनार समाज तसेच ओबीसी समाज प्रवर्ग मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका घेतली जाईल.
सोनार समाजाला राज्यकर्ती जमात बनवू पाहणाऱ्या तथाकथित समाज घटकांनी सत्ताधारी महायुतीतील. घटक पक्षांकडून उमेदवारीचे तिकीट चालून आले, तरी स्वीकारू नये किंवा लाचारीने मागू नये. अन्यथा त्यांच्यावर असलेला उरला सुरला विश्वास देखील ते गमावून बसतील, असा इशारा सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या वतीने सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या