🌟संपादक धम्मपाल हानवते यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते यांना त्यांनी पत्रकारिता योगदानाबद्दल अतिशय प्रतिष्ठेचा आयडियल स्टेट अवार्ड हा पुरस्कार काल रविवार दि.०८ सप्टेंबर २०२४ रोजी नांदेड शहरातील वजीराबाद येथील के.आर.एम.महिला विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात दैनिक क्रांतीशस्त्र या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकहीतवादी पत्रकारीतेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संपादक धम्मपाल हानवते यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......
0 टिप्पण्या