🌟शेतकरी शासकिय मदतीपासुन वंचित : मेडशी येथील पर्जन्य मापक यंत्र उठले शेतकऱ्याचा मुळावर....!


🌟शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचित का ? असा प्रश्न शेतकरी बांधवांतून उपस्थित होत आहे🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मेडशी येथील पर्जन्यमापक हे एक साधन आहे जे ठराविक कालावधीत ठराविक भागात पर्जन्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते.बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचे एकक म्हणून मिलिमीटर वापरतात आणि काहीवेळा मोजमापाचे परिणाम एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटरमध्ये असतात.पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाते या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाते व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाते.

मेडशी मधील पर्जन्यमापक यंत्र हे सौर उर्जेवर चालणारे आहे.सौर प्लेटच्या साह्याने सदर यंत्रामध्ये विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करते.मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते जसं पाहिजे तस विद्युत प्रभारीत झाले नाही.पाऊस रात्री 2 वाजता नंतर पडल्यामुळे त्याचं कार्यपद्धती ही कमकुवत झाली.जो मुसळधार पाऊस झाला 23 सप्टेबरच्या रात्री त्याच्या परिपूर्ण माप सदर यंत्रामध्ये मापून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येते सक्षमपने पाठवण्यात अयशस्वी झाले.त्याचे दुष्परिणाम मेडशी मंडळ मधील शेतकरयांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहे.मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होउन सुद्धा बिघाड झालेल्या यंत्रामुळे या वेळी गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे.ह्याला दोष कोणाचा म्हणावा शेतकऱ्याच्या पाठीमागे असलेल्या साडे सातीचा का नशिबाचा  ह्याचं उत्तर काळच देईल.

गावातील वयोवृद्ध व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आज पर्यंत 23 सप्टेंबर एवढा भीषण असा महापूर कधीच पहिला नव्हता.नदी नाल्याच्या पात्रात पाणी बसत नव्हते.शेती खरडून गेल्या तरीसुद्धा शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचित कसा राहिला असा प्रश्न शेतकर्‍यांनी ऊपस्थीत केला आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या