🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीची जमीन पेट्रोल पंपाला देण्याच्या निर्णया विरोधा उद्या धरणे आंदोलन....!


🌟गुरु‌द्वारा गेट नंबर 01 समोर उद्या दि.28 सप्टेंबर रोजी स्थानिक शिख समाजाच्या वतिने करण्यात येणार धरने आंदोलन🌟 


नांदेड :- मागील दिनाक 19/09/2004 रोजी बाबा फतेहसिंघ जी बहुउद्‌देशीय सेवाभावी संस्था व स्थानिक शीख समाजाच्या वतिने सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब नांदेड ची शहरामध्ये मध्यवती हिंगोली गेट रोड वरिल व शहीद भगत सिंघ रोड अबचलनगर स्थित सिटी सर्वे नंबर 94-95 त्यामध्ये पेट्रोल पंप साठी लिज वर भाड्याने देण्याचा स्पष्ट केले आहेत गुरु‌द्वारा सचखंड बोर्ड नांदेड द्वारे या आगोदर ठराव पारित केलेला आहे की  गुरु‌द्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब नांदेड ची कोणतीही मोकळी जमीन, प्लॉट इत्यादि कोणासही भाडेतत्वावर देण्यात येऊ नये परंतु प्रशासक हे सगळे नियमाच्या विरुध्द जाऊन गुरुघराची मोकळी जमीन पेट्रोल पंप साठी लीज वर भाड्याने देण्याची टेंडर प्रारित केले आहेत दिनांक 19 सप्टेंबर रोजी गुरु‌द्वारा बोर्ड अधिक्षका मार्फत प्रशासक यांना निवेदन द्वारे कळविण्यात आले होते की आपण जाहिर केलेल्या टैडर तात्काळ रद्द करण्यात यावे परंतु आज तारीख पर्यंत गुरुद्वारा बोर्डाच्या वतिने या विषयावर प्रशासक व अधिक्षक यांच्या वतिने कोणतेही ठोस निर्णय घेऊन टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही त्या विरोधात दिनांक 28/09/2014 रोजी सचखंड गुरुद्वारा गेट नंबर एक दर्शन देवड़ी मध्ये स्थानिक शिख समाज बांधव व बाबा फतेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतिने धरने अंदोलन करण्यात येणार आहेत तरी  सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित रहावे अहवान संस्थेचे संस्थापक स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी केले आहे.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या