🌟जनशताब्दी एक्स्प्रेसला सेलू,परतूर स्थानकांवर मिळणार थांबा🌟
नांदेड (दि.13 सप्टेंबर 2024) : नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या काही रेल्वे स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला असून सहा महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. शनिवार दि.14 सप्टेंबर 2024 पासून जनशताब्दी एक्स्प्रेसला सेलू, परतूर स्थानकांवर थांबा मिळणार आहे.
प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलेल्या स्थानकांमध्ये नांदेड विभागातील सेलू,परतूर, मेहबूबाबाद, करीमनगर या चार स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हिंगोली जन शताब्दी,हिंगोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी या गाड्यांना सेलू,परतूर स्थानकांवर शनिवारी थांबा देण्यात येणार आहे.......
0 टिप्पण्या