🌟नांदेड येथील मदीना हॉटेलचे मालक शेख युनूस यांच्या हत्ये प्रकरणी मयताच्या मुलासह इतर दोन आरोपी अटक.....!


🌟वजिराबाद गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी🌟

नांदेड :- नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश कुमार अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक सुरज गुरव,नांदेड शहर उपविभाग सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती, किरितिका सी.एम. यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दि.01 सप्टेंबर 2024 रोजी शहरातील वजिराबाद पोलीस स्थानकात गुरंन 440/2024 कलम 103 (1) भारतीय न्याय संहीता अंतर्गत दाखल खुनातील गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

सदरील सुचनां प्रमाणे वजिराबाद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचे मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस स्थाशकातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आर.डी वटाने,पोलिस अंमलदार पोहेकॉ दत्तराम जाधव,पोहेकॉ.विजयकुमार नंदे,पोहेकॉ.मनोज परदेशी,पोना.शरदचंद्र चावरे,पोकॉ.बालाजी कदम, पोकॉ.रमेश सूर्यवंशी,पोकॉ.इम्रान शेख,पोकॉ.भाऊसाहेब राठोड,पोकॉ.अंकुश पवार व सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजेंद्र सिटीकर,पोहेकॉ दिपक ओढणे यांनी गुन्ह्यातील संशयीत मयताचा मुलगा शेख यासेर अरफाद पिता शेख युनुस वय 20 वर्षे व्यवसाय हॉटेल चालक राहणार दुल्लेशहा रहेगाननगर, वाधी रोड, महमुद फंक्शन हॉलचे पाठीमागे नांदेड यांचेकडे गुन्ह्या संबधाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सांगीतले की त्याचे मयत वडील हे त्यास व त्याची आईस मोठ्या प्रमाणावर मानसीक त्रास देत होते त्यांना मारहान करीत होते तो त्रास असाह्य झाल्यामुळे मयताच्या मुलांने त्याचा ओळखीचा मित्र शेख अमेर राहणार चौफाळा नांदेड यास वडील युनुस यांना मारण्याची सुपारी दिली होती त्या माहिती वरुन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी घटणास्थळाचे ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत गोपनीय बातमीदार नेमण्यात आले. त्यांचे कडुन प्राप्त माहीतीचे आधारे व सायबर सेल नांदेड यांचे सहर्कायाने तांत्रीक माहीती हस्तगत करून त्या माहीतीच्या आधारे यातील आरोपीताचे नावे निष्पण करुन आरोपी नामे शेख अमजद पिता शेख ईसाख वय 24 वर्षे व्यवसाय काळी पिवळी जीप चालक राहणार आंबेडकरनगर (सिकंदरनगर) मनमाड तालुका नांदगांव जिल्हा नाशिक,योगेश शिवाजी निकम, वय 24 वर्षे व्यवसाय गवंडी / मिस्त्रीकाम राहणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड, पोलीस ठाणे मनमाड तालुका नांदगांव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे गुन्ह्या संबधाने विचारपुस करता त्यांनी खुन केल्याची कबुली दिल्याने तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे यांनी नमुद तिन आरोपीतांना अटक करुन काल दि.06 सप्टेंबर 2024 रोजी मा.न्यायालयात पी.सी.आर. कामी हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत पिसीआर. मंजुर केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास तपास अधिकारी करीत असून वर नमुद अज्ञात खुनाचा गुन्हा उघड करुन चांगली कामगिरी केल्याने वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या