🌟पुर्णेतील भारत स्काऊट गाईडचे सात विद्यार्थी दमरे च्या वतीने राज्यस्तरीय भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने सन्मानित...!


🌟सिकंदराबाद येथे राज्य पुरस्कार वितरण सोहळा रेल निलायम या ठिकाणी संपन्न🌟 

पुर्णा (दि.२९ सप्टेंबर २०२४) - पुर्णा येथील भारत स्काऊट गाईडच्या सात विद्यार्थ्यांना दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने राज्यस्तरीय भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार २०२३-२४ देऊन गौरवण्यात आले आहे.

           सिकंदराबाद येथे राज्य पुरस्कार वितरण सोहळा रेल निलायम या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरुण कुमार जैन, सहाय्यक व्यवस्थापक नीरज अग्रवाल, पी. किशोर बाबू , ए. के. रावत, टी. डी. गौरीशंकर, वहीदुन्नीसा बेगम, एम. सेल्वकुमार, व्ही. सोपान, मनोज बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारत स्काऊट गाईडच्या गौरव सौदा, रोहन साळवे, सईद शिबान, ओम मंगेश, ओम महेश, प्रशांत उमर, रितेश दुशिंगे या विद्यार्थ्यांना ' भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार २०२३-२४' ने गौरवण्यात आले. त्यांना  प्रशिक्षक अशोक खरे, अनिल सौदा, संतोष साळवे, आनंद खरे, आनंद गायकवाड, सतीश चावली, दीपक साळवे, मोहम्मद तहजीब, अजय खंदारे, मनोज निकाळजे यांनी मार्गदर्शन केले होते. दक्षिण मध्य रेल्वेने पुरस्कार दिल्याबद्दल सर व्यवस्थापक व निवड समितीचे मोहम्मद तहजीब यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या