🌟धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक : परळीत २३ सप्टेंबरला होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे...!


🌟शिवदास बिडगर,विश्वनाथ देवकते,चंद्रकांत देवकते यांचे समाज बांधवांना आवाहन🌟 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंढरपूर,लातूर,नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोमवार दिनांक 23/9/24 रोजी सकाळी 10 वाजता परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे रस्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व परळी-वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील सकल धनगर समाजच्या रास्ता रोको मध्ये सहभागी होऊन आपल्या हक्काच एस टी आरक्षण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान धनगर समाजाचे युवा नेते शिवदास बिडगर, विश्वनाथ देवकते, चंद्रकांत देवकते व सकल धनगर समाज परळी-वैद्यनाथ जिल्हा बीड यांनी केले आहे. 


           आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून धनगर जमातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. 2014 साली महायुतीचे सरकार असताना पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता. आताही सरकार त्यांचेच आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा या सरकारला पाडल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला.  

         आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसाठी सोमवार दि. 23/9/24 रोजी सकाळी 10 वाजता परळी-वैद्यनाथ येथील ईटके काॅर्नर येथे रस्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धनगर समाजाचे युवा नेते शिवदास बिडगर, विश्वनाथ देवकते, चंद्रकांत देवकते व सकल धनगर समाज परळी-वैद्यनाथ जिल्हा बीड यांनी केले आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या